
U-19 WOMENS WC 2025-युवा क्रिकेटपटूंची स्वप्न साकार झाली!”
भारताच्या 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघाने विश्वविजेतेपद जिंकले क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकण्याचा मान भारताच्या 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघाला मिळाला सलग दुसऱ्यांदा अंडर 19 महिला टी-20 विश्वचषक 2025 ते जे ते पद भारताच्या नावावर झाले.
भारताच्या फिरकी पट्टूंनी ही कामगिरी करून दाखवली आणि त्यांच्या असणाऱ्या योगदानामुळे भारत खूप चांगल्या आपल्या आत्मविश्वासाने क्रिकेटचा सामना जिंकला भारतीय 19 वर्षाखालील संघ हा पुन्हा एकदा विश्वविजेता बनला. या वर्ल्डकप मध्ये अजिंक्य राहिलेल्या अशा भारताच्या संघा ने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचा नऊ विकेट्स ने पराभव करत विश्वच विजेतेपदावर नाव कोरले.
भारताने हा विजय आपल्या तीन फिरकीपटू गोलंदाजांच्या महत्त्वपूर्ण गोलंदाजीमुळे जिंकला आहे. भारताच्या फलंदाज आहेत त्रिशा गोंगाडी हिने या सामन्यात खूप चांगली कामगिरी करून 40 धावांची योगदान दिले आहे.
U-19 WOMENS WC 2025
व ती सर्वाधिक धावा करणारी भारताची उत्कृष्ट फलंदाज झाली आहे तसेच तिने गोलंदाजीतही तीन विकेट्स घेतल्या याशिवाय पारोनिका सिसोदिया वैष्णवी शर्मा आणि आयुष्य या फिरकीत त्रिकूटाने भारताचा विजय अगदी त्यांच्या तोंडाजवळ आणून ठेवला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या 82 धावांचा पाठलाग करता करता भारताला विक्रमी कामगिरी करून देणाऱ्या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली.
कमालिनी ही 8 धावा करत लवकर बाद झाली.यानंतर उपकर्णधार सानिका चाळके आणि त्रिशा गोंगाडी या दोघींनी चांगली भागीदारी केली.तर सानिका चाळके हिने 22 चेंडूत 4 चौकारांसह २६ धावा काढल्या.आणि शेवटच्या चौकाराने ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत ८२ धावत सर्व बाद अशी धाव संख्या केली..भारताच्या गोलंदाजी पुढे सर्व दक्षिण आफ्रिका संघ पूर्ण गारद झाला.दक्षिण आफ्रिकेचा संघ एक एक धावेसाठी खूप मेहनत घेत होता.
आफ्रिकेने पहिल्या पावर प्लेमध्ये तीन विकेट्स दमवत 29 धावा गेल्या व पुढच्या पाच ओव्हर मध्ये त्यांनी एकही विकेट गमावली नसली तरी त्यांनी फक्त चारच धावा गेला भारताच्या फिरकीपटूंनी नो विकेट्स घेऊन आपला दरारा कायम ठेवला व वेगवान गोलंदाजाने फक्त एकच विकेट घेतली भारतीय फिरकीपटूंची जादू ही मैदानावर दिसून आली.
U-19 WOMENS WC 2025-विजयाने युवांमध्ये नवचैतन्य आणले!”
भारताच्या जिंकण्यात खूप सारे योगदान हे त्यांनी केले पारुनी का सिसोदियाने साथ धावा दे दोन विकेट्स घेतल्या आणि आयुष्य शुक्लाने नऊ धावा देत दोन विकेट्स घेतले वैष्णवी शर्मा हिने 23 धावा ते दोन विकेट्स घेतला तर गोगाडी त्रिशाने 15 धावा देत तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या भारताच्या या संघाने खूप चांगली कामगिरी केली.
महिला निवड समितीने आगामी ICC साठी भारताच्या U-19 WOMENS WC 2025 अंडर-19 संघाची घोषणा केली. ही स्पर्धा 18 जानेवारी 2025 ते 02 फेब्रुवारी 2025 या कालावधीत मलेशियामध्ये खेळवली गेली.
संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (डब्ल्यूके), भाविका अहिरे (डब्ल्यूके), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम, वैष्णवी एस.
ICC क्रिकेट कसोटी संघात ३ जणांचा समावेश
गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास! महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकात केला मोठा पराक्रम
बीसीसीआयचे अध्यक्ष श्री. रॉजर बिन्नी: “U-19 WOMENS WC 2025 महिला विश्वचषक जिंकल्याबद्दल आमच्या मुलींचे अभिनंदन. ही एक अनुकरणीय मोहीम होती ज्यामध्ये त्या अजिंक्य राहिल्या. काल रात्री नमन पुरस्कारांमध्ये आम्ही त्यांच्या कामगिरीबद्दल बोललो. आणि आज त्यांनी आपल्या सर्वांना अभिमान वाटला आहे. ही ट्रॉफी भारतातील महिला क्रिकेटच्या वाढीचे प्रतिबिंब आहे आणि या स्पर्धेत प्रत्येक सदस्य चमकताना पाहून मला खूप आनंद होत आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण संघाचे, प्रशिक्षकाचे आणि संघाचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करतो आणि मी सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करायला आवडेल.”
बीसीसीआयचे मानद सचिव देवजित सैकिया म्हणाले, “U-19 WOMENS WC 2025 उल्लेखनीय जेतेपद राखण्यासाठी मी भारताच्या अंडर-१९ महिला संघाला शुभेच्छा देतो. ही ऐतिहासिक कामगिरी साध्य करणे आणि ते करत राहणे माझ्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असेल. दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणे हे त्यांचे समर्पण, लवचिकता आणि जागतिक स्तरावरील वर्चस्व दर्शवते. संपूर्ण संघाने सपोर्ट स्टाफसह खेळाच्या सर्व पैलूंमध्ये प्रचंड कौशल्य, टीमवर्क आणि दृढनिश्चय दाखवला. हे जग चषक जिंकणे हे भारताच्या तळागाळातील संघाच्या ताकदीचे प्रतीक आहे. क्रिकेटची ताकद आणि आपल्या महिला खेळाचे उज्ज्वल भविष्य अधोरेखित करते.”
बीसीसीआयचे उपाध्यक्ष श्री. राजीव शुक्ला म्हणाले, “आमच्या तरुण आणि प्रतिभावान संघाच्या या अविश्वसनीय कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. मलेशियामध्ये झालेल्या आयसीसी महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद यशस्वीरित्या राखल्याबद्दल भारताच्या अंडर-१९ महिला संघाचे अभिनंदन. ! माझे मनापासून अभिनंदन. त्यांच्या शिस्त, दृढनिश्चय आणि निर्भय क्रिकेटने पुन्हा एकदा देशाला गौरव मिळवून दिला आहे. सलग दोन विश्वचषक जिंकणे सोपे काम नाही आणि हा विजय त्यांच्या कठोर परिश्रम आणि चिकाटीचे प्रतीक आहे. हे सलग विजय त्यांच्या कामगिरीचे प्रतीक आहेत. संपूर्ण भारताचा अभिमान. तरुण मुलींच्या पुढच्या पिढीला क्रिकेट खेळण्यासाठी आणि मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरणा देईल.”
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष श्री. प्रभतेज सिंग भाटिया: “आयसीसी U-19 WOMENS WC 2025 झालेल्या शानदार विजयाबद्दल भारताच्या १९ वर्षांखालील महिला संघाचे अभिनंदन!” विश्वचषक विजेतेपदाचे यशस्वीरित्या रक्षण करणे ही एक दुर्मिळ आणि प्रशंसनीय कामगिरी आहे आणि या तरुण संघाने दबावाखाली उत्तम परिपक्वता, कौशल्य आणि संयम दाखवला आहे. त्याचा प्रवास प्रेरणादायी राहिला आहे आणि त्याने पुन्हा एकदा संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. त्यांच्या सततच्या यशाने बीसीसीआय आनंदी आहे, ज्यामुळे भारतातील महिला क्रिकेटचा पाया आणखी मजबूत होतो. मला खात्री आहे की हे तरुण विजेते वरिष्ठ स्तरावर आणखी मोठे यश मिळवतील.”