ICC क्रिकेट कसोटी संघात ३ जणांचा समावेश

ICC क्रिकेट कसोटी संघात ३ जणांचा समावेश

आयसीसी ची या वर्षाची 2024 ची यादी जाहीर झाली या यादीमध्ये ते कसोटी व य क्रिकेटचे जे खेळाडू आहेत .ICC क्रिकेट त्यांची यादी जाहीर करतात .त्यामध्ये सर्व देशांचे खेळाडू एकत्र असतात.तर यावर ही आयसीसी ने ही यादी जाहीर केली.

या यादीमध्ये भारतीय संघातील तीन खेळाडू चा चा समावेश करण्यात आलेला आहे. यात सर्व यशस्वी जयस्वाल अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि भारताचा सगळ्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आलेला आहे.तर एक दिवसीय क्रिकेट संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही..
जसप्रीत बुमराह ने 2024 मध्ये ICC क्रिकेट कसोटीत आपले कौशल्य दाखवलेले आहे.त्याने 200 बळी घेऊन वी च्या सरासरीने कसोटी मध्ये 200 पेक्षा जास्त विकेट्स घेतले आहेत.जसप्रीत बुमराह ने 14 च्या सरासरीने 71 फलंदाजांना तंबूत परतवले आहे.हे सर्व त्याने या 2024 मध्ये केलेले आहे.

यामुळे तो गोलंदाजांच्या पहिल्या पंक्तीत येऊन बसला आहे.आणि पहिला स्थानावर त्याची निवड झालेली आहे. बुमराहने इंग्लंड विरुद्ध आतील चार लढतींमध्ये 19 बांगलादेश विरुद्धच्या दोन लढतीत 11 बळी घेऊन त्याची चुणूक दाखवली आहे.त्याने 2024 मध्ये 29 च्या सरासरीने 527 धावा सुद्धा काढलेले आहेत.                       DEEPSEEK हे काय आहे जे जागतिक तंत्रज्ञानावर धोका निर्माण करत आहे…..

24 च्या सरासरीने 48 बळी देखील घेतले आहेत.तसेच यशस्वी जयस्वालने ICC क्रिकेट ही आपले स्थान पक्के केले आहे .आत्ताच झालेल्या इंग्लंड विरुद्ध च्या मालिकेमध्ये त्याने 712 धावा रचल्या यामध्ये दोन दुहेरी शतके व तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची बॅट चालली नसताना यशस्वी जयस्वालने एका बाजूला लावून धरत सर्वाधिक 391 धावा काढल्या 2024 मध्ये 55 च्या सरासरीत 1478 धावांचा खूप चांगल्या अशा रन्स बनवल्या.

2024 मध्ये इंग्लंडचा जो रूट याने सर्वाधिक धावा काढत म्हणजेच 1535 धावा काढून हा पहिला फलंदाज ठरला. या संघामध्ये भारताचे तीन तर इंग्लंडचे चार आणि न्यूझीलंडचे दोन व श्रीलंकेचा एक खेळाडूला पसंती देण्यात आलेली आहे.आणि या संघाचे नेतृत्व हे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार पेट कमिन्स याच्याकडे सोपवण्यात आलेले आहे.

ICC क्रिकेट
RAJKOT, INDIA – FEBRUARY 16: India bowler Jasprit Bumrah appeals without success for a wicket during day two of the 3rd Test Match between India and England at Saurashtra Cricket Association Stadium on February 16, 2024 in Rajkot, India. (Photo by Gareth Copley/Getty Images)

ICC क्रिकेट

आता या कसोटीसाठी संघ पुढीलप्रमाणे
पाठ कमिन्स ,(कर्णधार )ऑस्ट्रेलिया
यशस्वी जयस्वाल ,भारत, बेन डकेट ,इंग्लंड ,केन विल्यम्सन, न्युझीलँड, जो रूट व हॅरी ब्रूक, इंग्लंड, कामेंदू मेंडेस ,श्रीलंका ,जेमी स्मित(यष्टीरक्षक), इंग्लंड, रवींद्र जाडेजा ,भारत, हेन्री ,न्यूझीलंड ,जसप्रीत बुमराह, भारत ,अशी या एक दिवसीय नाही तर कसोटी संघाची यादी आहे.

तर एक दिवसीय संघामध्ये भारताच्या कोणत्याही कोणत्याही खेळाडूला स्थान मिळाले नसले तरी ICC क्रिकेट एक दिवसीय संघात श्रीलंकेचे चार व पाकिस्तान आणि अफगाणिस्तान चे प्रत्येकी तीन तीन आणि वेस्टइंडीज चा एक खेळाडू अशी एक दिवसीय संघातील खेळाडूंची निवड झाली आहे.

https://www.lokmat.com/business/news/what-exactly-is-deepseek-ai-tool-app-the-one-that-caused-huge-loss-america-who-is-behind-it-a-a720/

भारतातील एकाही खेळाडूला एक दिवसीय संघात स्थान मिळाले नाही. पण आयसीसी ने कसोटी संघात आपल्या भारतातील तीन नामवंत खेळाडूंना संधी दिल्यामुळे आता पाहू या हे तिघेजण आपल्या भारताचे नाव कसं उंच करत आहेत.

जसप्रीत बुमरा याच्याकडून प्रत्येक भारतीयाला खूप मोठी आशा आहे. तो खूप चांगला गोलंदाज असून त्याची गोलंदाजी ही प्रत्येक व्यक्तीला आवडते. तसेच रवींद्र जडेजा हा सुद्धा भारताचा एक ऑलराऊंडर खेळाडू असून तो सुद्धा ऑल टाइम फेवरेट आहे.

आणि यशस्वी जयस्वालने सुद्धा कमी वयात चांगली कामगिरी करून दाखवली आहे. तरीही आपल्या या तीनही खेळाडूंना आपल्याकडून हार्दिक शुभेच्छा .चांगली कामगिरी करतील अशी आशा बाळगतो.

भारतीय महिला संघातील सुद्धा खेळाडूंची निवड झाली आहे .त्यातील दोन खेळाडूंची निवड एकदिवसीय संघात झालेली आहे त्यात भारतीय संघाची कर्णधार स्मृती मंधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्माला 2024 मधल्या एक दिवसीय संघात स्थान मिळाले आहे. हे दोन्हीही महिला संघातील खेळाडू आहेत त्यांना सुद्धा भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top