2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प
” आज मुळात होता 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प दिन आज बजेटचा दिवस असल्याकारणाने शेअर मार्केटमध्ये सकाळपासूनच अप्स अँड डाऊन मुव्हमेंट सुरू होते मार्केट कधी वर तर कधी खाली जात होते. आज आपल्या देशाचे म्हणजे आज आपल्या भारत देशाचे 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प हे सादर केले गेले निर्मला सीतारमन यांनी बजेट वाचण्यास सुरुवात केली.
बजेट सादर करताना त्यांनी विकासदर वाढवणे, खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे, मध्यमवर्गीयांना बळ देणं,आणि आपल्या शेतकरी लोकांना फायदा देणे,हे या अर्थसंकल्पातून तयार केले आहे.असं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी घोषित केले सकाळी 11 वाजता आपल्या 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात झाली.त्यावेळी नरेंद्र मोदी सुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान उपस्थित होते.
आणि निर्मला सीतारामन यांनी बजेट वाचनास सुरुवात केली. त्यांनी असे सांगितले की आरोग्य आणि रोजगार याच्यावर आमचं लक्ष आहे पुढील पाच वर्ष विकासाला संधी द्यावी विकासाची संधी देणार आहोत.नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देईल गती देण्यात येईल. खाजगी गुंतवणूक वाढीवर सरकार भर देत आहे.कृषी क्षेत्र सुद्धा आत्मनिर्भरतीकडे नेण्याचा आमचा हेतू आहे.
100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजना धनधान्य कृषी योजना तसेच एक करोड 70 लाख शेतकऱ्यांना धनधान्य कृषी योजनांचा लाभ मिळालेला आहे. निर्मला सीतारमन यांनी 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प वाचत असताना समाजवादी पार्टीच्या खासदारांनी सभा त्याग केला. तसेच कापूस उत्पादन हे वाढवण्यावरही प्रोत्साहन देणार आहेत.
मत्स्यपालन या क्षेत्रातही काहीतरी नवीन करण्यासाठी भर देणार आहेत.असे निर्मला सीतारामन यांनी 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये म्हटले आहे. तसेच बिहारमध्ये मखाना उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मखाना बोर्डाची स्थापना केली जाईल. शेतकऱ्यांना मोठी बातमी देण्यासाठी त्यांनी 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये असे सांगितले आहे.की शेतकऱ्यांसाठी त्यांनी किसान क्रेडिट कार्डवर जे कर्ज मिळते त्या कर्ज मर्यादेत तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढ केली गेली आहे. हे 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प हे भारतासाठी खूप आशादायी आहे.
भारतामध्ये खेळणी उद्योगाला सुद्धा अग्रस्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत.आणि आपल्या देशाचा मेड इन इंडिया असं खेळण्यांचे उत्पादन असलेले ब्रँड हे भारताला नाव मिळवून देईल.असे प्रयत्न 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये केले आहेत. डाळीमध्ये सुद्धा आपण स्वतःच्या येथे काहीतरी करू शकतो.यासाठी सरकारने सहा वर्षाचा कार्यक्रम केला आहे.
त्यामध्ये विशेष लक्ष हे तूरडाळ, मुगडाळ,उडीद, मसूर, अशा पिकांवर केला आहे. त्यात भाजीपाला आणि फळ यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापक कार्यक्रम सुरू केला जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. सक्षम अंगणवाडी आणि पोषण आहार दोन ही सुद्धा योजना त्यांनी जाहीर केली.
यामध्ये आठ कोटी नहून जास्त मुलांना पोषण आहार पोहोचवला जाईल .सर्व सरकारी माध्यमिक शाळा ज्या आहेत. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल.अटल टिंकरिंग लॅब अशा 50 लाख लॅब पुढच्या पाच वर्षात सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील. आणि निर्मला सीतारमांनी ह्या ज्या अर्थमंत्री आहेत.
यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी घोषणा केली आहे.त्यात त्यांनी पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये 75000 जागा वाढवण्याचे निश्चित केले आहे.आयआयटीच्या सुद्धा 6500 जागा वाढवल्या जातील. देशात थ्री ए आय एक्सेल सेंटर उभारणार असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
पायाभूत सुविधांची सुद्धा अंमलबजावणी करणार आहेत त्यासाठी पायाभूत सुविधांसाठी त्यांनी दीड लाख कोटी रुपये राज्यांसाठी मंजूर केले आहेत.
युनियन बजेट 2025 यासाठी विकसित भारतासाठी न्यूक्लिअर एनर्जी मिशन 2047 या न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून शंभर गिगावॅट ऊर्जा उत्पन्नाचे लक्ष सुद्धा या बजेटमध्ये सादर केले गेले. भारतात उपचार घेणाऱ्यांसाठी व्हिसा सहज मिळणार आहे.
लाईव्ह विजाची पद्धत सोपी होणार आहे.व्हिसा चे नियम सोपे होणार आहेत.एकोणवीस हजार कोटी रुपयांचे अणुऊर्जा मिशन तयार केले जाईल.2047 पर्यंत 100 gigawat अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे लक्ष आहे. पुढील आठवड्यात सरकार नवीन आयकर विधेयक आणणार असल्याने अर्थमंत्री सीतारामन यांनी असे जाहीर केले आहे. नवीन आयकर विधेयकांचा टॅक्स स्लॅबस शी काही संबंध नाही.36 जीवनावश्यक औषधांवर झुकर लागत होता.त्या करामध्ये सूट जाहीर केली आहे.कॅन्सरची जी औषध आहे.ते औषध स्वस्त होणार आहेत.कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी पूर्णपणे हटवली गेली आहे. आता आपण पाहूया काय स्वस्त आणि काय महाग टीव्ही मोबाईल औषधे आणि इलेक्ट्रिक कार या स्वस्त होणार अशी अर्थसंकल्पात म्हणजेच 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये घोषणा केली गेली आहे.
एलसीडी टीव्ही महाग होणार आहे. चामड्याच्या वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहेत. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ होईल. टीडीएस मध्ये सुलभता आणणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मध्ये जी मर्यादा आहे. ती एक लाखांपर्यंत वाढवली गेली आहे.
आयकर भरण्याची मर्यादा चार वर्षापर्यंत वाढवली आहे. म्हणजे आपण चार वर्षापर्यंतचा जो अपडेट टॅक्स रिटर्न भरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या कर रचनेअंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होणार नाही..
आता पाहूया नवीन कर प्रणाली 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70 हजारांची सूट मिळणार आहे. 25 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर एक लाख वीस हजारांची सूट महिन्याला एक लाख उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही कर नाही नव्या कर रचनेअंतर्गत 12 लाख रुपयां पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.
केवळ 12 लाखच नाही तर 15, 20 आणि 25 लाख कमाईदारांना सुद्धा आयकरात बंपर फायदा, गणित समजून घ्या

2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प
नवीन कर रचना जाणून घेण्यासाठी खालील समजून घ्या.
१२ लाख पर्यंत = ० %
४ लाख पर्यंत = ० %
४ लाख ते ८ लाख पर्यंत = ५ %
८ लाख ते १२ लाख पर्यंत = १० %.
12 ते 16 लाख रुपयांवर 15 टक्के
16 ते 20 लाख रुपयांवर 20%
20 ते 24 लाख रुपयांपर्यंत 25%.
24 लाख रुपये पेक्षा जास्त जे आहे त्याला 30%
अशी कर रचना केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बजेट 2025 जे आहे त्याच्याबद्दल असे सांगितले आहे की बारा लाख रुपयांपर्यंतच्या कर रचने जो टॅक्स भरावा लागणार नाही त्या करप्रचनेचा मध्यमवर्गीय आणि तरुणांना जो फायदा होणार आहे तो खूप चांगला आहे
आणि तो देशाच्या आर्थिक विकासात एक मौलाचा दगड ठरणार आहे अतिशय धीराने घेतलेला हा जो निर्णय आहे आणि रोजगार निर्मितीसाठी होणार त्याचा फायदा होणार आहे तेल बियांच्या बाबतीत देखील निर्णय घेतलेला जो आहे.
शेतकऱ्यांच्या अधिक पैसे मिळण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे मासेमारी करणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे.असे खूप सारे महत्त्वाचे निर्णय घेऊन आपला देश पुढे नेण्यासाठी महासत्ता बनवण्यासाठी हे 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प खूप महत्त्वाचे आहे. असे देवेंद्र फडणवीस यांचे मत आहे.
तसेच महाराष्ट्र हा कापूस लावणारा शहर आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बजेटचा फायदा होईल मी आयुष्यात कधीच इन्व्हेस्टमेंट केली नाही मात्र मी लोकांमध्ये इन्व्हेस्ट करतो एक्स्ट्रा इन्कम येत असेल तर व्याज देतात त्याचा मोहन बाळगता सर्व गोष्टी तपासून चांगले एक्सपर्ट असतील त्यांना स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेला आहे..
2025-26 च्या जे बजेट आहे त्या बजेट बद्दल रामदास आठवले म्हणाले आहेत. सर्व लोकांना न्याय मिळणार आहे पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार आहोत. ते वेळ विरोधकांना कळणार आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे… 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प भारताचे सादर झालं त्याबद्दल आता महाराष्ट्राचा बजेट कधी सादर होणार याबद्दल उत्सुकता लागलेली असताना “अजित पवार “यांनी सांगितले देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे.
आता महाराष्ट्राचे 2025 चा याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे .मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचे बजेट सादर होणार आहे .शेतकरी लाडक्या बहिणींचा विचार करून बजेट सादर करणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करत आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल सितारामन यांचे अभिनंदन केले आहे.
तेजस्वी यादव सुद्धा म्हटले आहेत की चंद्रबाबू नायडू हे पॅकेज घेऊन निघून गेले .पण नितीश कुमार मात्र बिहार साठी काहीच मिळवू शकले नाहीत.. नरेंद्र मोदींनी सुद्धा आपली प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे. महात्मा निर्भर भारताच्या मोहिमेला बळ देणारे बजेट सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणार बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडले आहे.तर त्यांचे अभिनंदन 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच अर्थसंकल्प 2025 हा भारतासाठी आणि आपल्या इतर राज्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. अशी आशा बाळगू या आणि बजेट 2025 हे आपल्या देशात आपल्या राज्यात खूप मोठी क्रांती घडवेल ही बजेटला शुभेच्छा आणि आपल्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा या बजेटच्या हार्दिक शुभेच्छा.
The 2025 Central Economic Plan holds immense significance for you.