धर्मांतरासाठी महिलेला ठेवले डांबून आणि केला बलात्कार..

पुण्यातील महिलेवर केला बलात्कार विमान नगर परिसरात राहणाऱ्या 32 वर्षे महिलेला धमकावले व तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती केली.त्यासाठी तिला एका घरामध्ये दाबून ठेवण्यात आले.आणि तिच्यावर बलात्कार सुद्धा केला.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या विरोधात तिघांना अटक केली आहे. धर्मांतराची घटना ऐकून पुणेकर हादरले आहेत. यामुळे एका 32 वर्षे पीडितेला संतोष रामदास गायकवाड वय वर्ष 55 राहणार विठ्ठल मंदिरासमोर धानोरी, सागर मधुकर लांडगे वय वर्ष 30 ,गल्ली क्रमांक 3 माधवनगर, धानोरी येथे राहत असून त्यांच्यासोबत अजून एक महिलेला अटक केली आहे.

या तिघां विरोधात पोलिसांनी बलात्कार आणि बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी माहिती दिली आहे. की सदर आरोपी आणि महिला हे दोघेही एकमेकांना ओळखत होते.या तिघांनीही महिलेवर धानोरी येथे एका घरात डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार सुद्धा केला. आणि तिला धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली.सदर महिलेने सांगितलेली माहिती अशी की त्या महिलेला या तिघांनीही धानोरी परिसरात बोलवले आणि आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरात संतोष गायकवाड आणि सागर लांडगे या दोघांनी तिला बंद करून ठेवले आणि तिला बंदुकीचा धाक दाखवून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन दोन्ही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला असून बलात्कार करतानाचा व्हिडिओ मोबाईल वर चित्रीत केला असून तिला अशी धमकी दिली की जर तू आमचे ऐकले नाहीस तर हा व्हिडिओ आम्ही प्रसारित करू.त्यानंतर दोन्ही आरोपी सागर लांडगे आणि संतोष गायकवाड यांनी पीडित महिलेला लोहगाव येथे नेऊन एका घरात डांबून ठेवले व तिच्यावर बलात्कार सुद्धा केला.आणि धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती सुद्धा केली.पीडित महिलेने अशी माहिती पोलिसांना दिली आहे यावर पुढे तपास सुरू आहे लवकरच याचा उलगडा केला जाईल…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top