सुरुवातीला आपण दिल्लीला नाव ठेवत होतो कि दिल्ली मध्ये जास्त बलात्कार होतात तेथील महिला सुरक्षित नाहीत . पण सध्या मुंबई मध्ये पण सुरक्षित आहे असं वाटत नाही. मुंबई राममंदिर रेल्वे स्थानक परिसरात महिला दुरावस्तेत दिसली नंतर तेथील नागरिकांनी तात्काळ वनराई पोलीस स्थानकात घटनेबाबत माहिती दिली.. नंतर तेथील पोलीस येऊन पीडितेला घटना स्थळातून सोबत घेतले तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. पीडित महिला ही नालासोपारा येथील राहणारी आहे. हे तिने दिलेल्या माहितीच्या आधारे दिलेल्या माहितीतच्या आधारे पीडित महिला हि घटनेदिवशी घरातून भांडण करून गेली होती.त्या दिवशी ती गोरगाव ला रिक्षा ने जाताना तिच्यावर रिक्षा चालकाने अतिप्रसंग केला. असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले.. आरोपीने वसई बीचवर पिढीते सोबत जे कुकर्म केले त्यामध्ये रिक्षाचालकाने तिच्या गुप्तांगात सर्जरी ब्लेड आणि छोटे छोटे दगड भरले. आणि तिला बेशुद्ध अवस्थेत राम मंदिर या रेल्वे स्थानका जवळ सोडून आरोपी रिक्षा चालक राजरतन वालवाल पसार झाला. आरोपी राजरतन वालवाल याच्यावर याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली आहे.
या अगोदर पीडित तरुणीची चौकशी केली असता तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली. पीडित महिलेवर दोन वेळा अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. मात्र पीडित महिलाही पोलिसांशी खोटं बोलत होती.पीडित महिला यांनी दिलेली माहिती सुरुवातीला खोटी असून तिने सांगितले की आपण अनाथ आहोत. दोन दिवसापूर्वीच मुंबईला आलो आहोत. आणि त्या वेळेला मी रिक्षाने गोरेगावला जात असताना माझ्यावर अत्याचार झाला. असे अगोदर सांगितले होते पण तिच्या बोलण्यात तफावत जाणवल्याने अजून चौकशी केली असता असे समोर आले की पीडित महिलाही नालासोपारा येथे आई-वडिलांसोबत राहत होती. व त्या दिवशी तिच्या घरात वाद झाला होता.
म्हणून ती तरुणी नालासोपारा रेल्वे परिसरातून गोरेगावला जाण्यासाठी रिक्षा स्टँडवर आली व तेथेच रिक्षामध्ये बसून ती निघाली असता रिक्षा चालक राजरतन वालावाल याने तिची निर्जन स्थळी जाऊन तिच्यावर अत्याचार केला यानंतर पीडित महिलाही गोरेगावच्या राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडली हा घटनाक्रम बघितल्यानंतर असे लक्षात आले की, पीडित महिलेवर दोन वेळा अत्याचार झाला आहे. असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे आता पीडित महिलेच्या दिलेल्या माहितीच्या आधारे शहानिशा करत आहे याप्रकरणी रिक्षाचालक राजरतन वालवाल याला अटक केली असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.. आरोपीने तिच्या गुप्तांगात ब्लेड दगड टाकल्याने महिलेवर के एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत व रिक्षा चालक हा पकडला गेला असून त्याची पण कसून चौकशी चालू आहे रात्री उशिरा राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ पीडित महिलेला रडताना पाहिले व तेथील लोकांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली व वनराई पोलीस स्टेशनचे कर्मचारी तेथे ताबडतोब आले. आता पुढील तपास सुरू आहे व लवकरच याचा उलगडा केला जाईल.