ठाणे येथील सौ.अक्षता विक्रम पाटील याना विरार येथील शिवराज बहुउद्देशीय विकास संस्थेचा नारी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे उपस्थित होत्या त्यासोबत लायन्स क्लब वसई ड्रीम्सच्या शैला मानकर उपस्थित होत्या…
सन्मान करण्यासाठी तेथील अध्यक्ष यांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रशस्तिपत्रक देण्यात आले.व त्यासोबत सन्मान चिन्ह देण्यात आले.व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अक्षता यांचे त्यांच्या शब्दसुमनांनी कौतुक करताना म्हंटले अशा कष्ट करणाऱ्या आणि समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची समाजाला गरज आहे,व यांचे समाजासाठी योगदान पण खूप महत्वाचे आहे.असे म्हणाले. प्रसंगी अक्षता विक्रम पाटील यांनी त्यांचे मनोगत मांडले अक्षता विक्रम पाटील यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजातील दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहे त्यांच्या विकासासाठी अक्षता विक्रम पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आहे.. खूप कष्टातून आणि खूप मेहनती तून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे व एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे मागच्या वेळी सुद्धा त्यांना काही पुरस्काराने नामांकित केले होते त्यांचे हे यश असेच उत्तर उत्तर वाढत राहावे व त्यांना खूप सन्मान मिळावा ही शुभेच्छा